ते गीत कोकिळे गा
ते गीत कोकिळे गा पुन्हापुन्हा लुब्ध तुझ्या गाण्याला मुग्ध भावना तुझ्या गाण्याचे ऐकुन सूर नदीनाल्यांस येती पूर जललहरींतुनी प्रीत ये धावुनी तरूवेलीस येई कल्पना सप्तसूरांत होऊन दंग विश्व गाण्यात होई गुंग दंवबिंदूंतुनी गीत ये रंगुनी सूर तालास देई चालना तुझ्या कंठातले अमृताचे गीत आहे तुझे मोलाचे गोड गाण्यातले सूर हे आगळे धुंद जिवास देई प्रेरणा