PrintSource

ते नयन बोलले काहीतरी

Te Nayan Bolale Kahi Tari

रमेश अणावकर

ते नयन बोलले काहीतरी
मी खुळी हासले खुळ्यापरी

निळ्या नभापरी किंचित निळसर
नयन बोलके आणिक सुंदर
बघताबघता मीही क्षणभर
झाले ग बावरी

क्षण माझे मज मलाच नकळे
वसंत नयनी कधी दरवळे
तनुकोमल या वेलीवरले
फूल फुले अंतरी

मला हवे जे अतिमोहक ते
कसे अचानक जुळुनी येते
सांगाया मज लाज वाटते
संभ्रमांत क्षणभरी