ते स्वप्न भाववेडे
ते स्वप्न भाववेडे नयनी समूर्त होते फुलते मनात माझ्या अपुले अबोल नाते ती भेट पापण्यांची धुंदावल्या क्षणांची कायाच जाहली रे जणू बासरी विजेची त्या मूक गुंजनाच्या धुंदीत मी नहाते माझ्याहुनी सखे ग झाली अधीर वाणी शब्दास रूप येता ती लाजली कहाणी परि ओढ अंतरीची खुलुनी असीम होते पाऊल प्रीतीचे हे चाहूल मन्मथाची काहूर गोड वाटे, ही खूण या पथाची दाही दिशांत आता घुमती अनंग-गीते