तेच स्वप्न लोचनांत रोज रोज अंकुरे पाहतो नभात मी धुंद दोन पाखरे शरद चांदण्यातली भेट आठवे मला गुपित सांगता तुझा अधर मात्र रंगला रास संपला तरी भास अंतरी उरे तू सखे अजाणता कर करांत गुंफिला तुलामला तसे बघून गगनी चंद्र लाजला त्या स्थळी अजून मंद बकुलगंध मोहरे स्वप्नचूर लोचनांत एक रम्य आकृती सूर सूर होत सर्व भावना निनादती वाजतात पायीची बघ अजून नूपुरे