तेजोमया हे चिन्मया
तेजोमया हे चिन्मया उजळून या तिमिरात या नैराश्य हे जावो दुरी नवचेतना उगवो उरी विकसून या कुसुमांत या किराणांमध्ये बुडू दे मला मनमोकळे उडू दे मला विहगांपरी गगनात या ज्योतिर्मया सृष्टी नवी बघण्यास द्या दृष्टी नवी नव सूर्य व्हा हृदयात या