थंड ही हवा धुंद गारवा
थंड ही हवा, धुंद गारवा हा पाऊस रिमझिम बरसे ! रेशिमधारा या रुणझुणती जलथेंबांचे उधळित मोती पानफुले नाचती, गंधफुले भोवती झुलती जलांचे आरसे ! काजळकाळ्या या आकाशी वीज रेखिते सुंदर नक्षी वारा खुळा होउनी, नाचे कसा अंगणी गाणे खुषीचे गातसे ! हिरवी शेते हिरवी राने फुलली भवती हिरवी कवने नटली बघा ही धरा, झोक तिचा साजिरा नवरी नवेली ही दिसे !