थंड थंड अशी हवा हवेमध्ये गंध नवा हात तुझा हाती हवा, याहुन काही नको ! सांज अशी ही धूसर श्यामल श्वासांवर दरवळतो परिमल मनी तुझ्या प्रीतीची चाहूल, याहुन काही नको ! वसंत येथे सदा असावा फुलांतुनी अनुराग हसावा कणाकणांतून तोच दिसावा, याहुन काही नको ! ही हिरवी मखमल, हा वारा ह्या थुईथुई नाचती जलधारा एक झोपडी हाच निवारा, याहुन काही नको !