PrintSource

थेंबभर तुझे मन

Themb Bhar Majhe Man

थेंबभर तुझे मन ओघळले माझ्यावर
माझ्यापाशी मागत होते एक पाऊस, एक सर

थेंबभर तुझे मन बरसले माझ्यावर
सांगत होते कधी कधी दंवबिंदूंचे बांधू घर

थेंबभर तुझे मन फिदा झाले माझ्यावर
माझ्यासाठी माळत होते अबोलीचे वळेसर

थेंबभर तुझे मन कोसळले माझ्यावर
लाट जशी भरतीची एकाएकी तीरावर