ती येते आणिक जाते
ती येते आणिक जाते, येतांना कधि कळ्या आणिते, अन् जातांना फुलें मागते. येणें-जाणें, देणें-घेणें असतें गाणें जें न कधी ती म्हणते. ती येते आणिक जाते येतांना कधि अशी लाजते तर जातांना ती लाजविते : कळते कांही उगीच तेंही, नकळत पाही कांहीबाही, अर्थावाचुन उगीच 'नाही.. नाही..' म्हणते. ती येते आणिक जाते येतानांची कसली रीत : गुणगुणते ती संध्यागीत जातांना कधि फिरून येत, जाण्यासाठिच दुरुन येत, विचित्र येते, विरून जाते जी जी सलते. ती येते आणिक जाते