तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी
तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी एक नित्य प्रार्थना तिमिर जळू दे, ज्योत उजळु दे हीच मनोकामना ओलांडून हा सोनउंबरा लक्षुमी आली घरी सरस्वतीचा हात धरुनी तिला पूजुया उरी सौभाग्याचे अभंग लेणे जपूया कुंकुंमखुणा वत्सलतेचा गहिवर जेथे, स्पर्श प्रभुचा तेथे होऊन मुरली घन:श्यामाची गोकुळनगरी गाते तोच फुलांना जागविणारा, विश्वाची प्रेरणा वाळवंटी ही कृष्णकमलिनी होऊन मीरा झुरते ठायी ठायी रूप तयाचे ध्यानामधुनी दिसते जन्म होऊ द्या नृत्य हरीचे मंगलमय चेतना