तू अबोल होउन जवळी मजला घ्यावे मी भान विसरुनी धुंद चांदणे प्यावे ही विशाल अवघी मृदुल असावी धरती चांदवा रेशमी गर्द जांभळा वरती वर चंद्ररुपेरी झुंबर एक झुलावे क्षितिजात झळकता मंद केशरी तारा अंगावर घ्याव्या धवल दुधाच्या धारा त्या धारांनी चिंब मला भिजवावे कचबंध मोकळा तुझ्या करांनी व्हावा मधुगंध मंदसा बकुलफुलांनी द्यावा तू चंद्रबनातिल स्वप्निल रंग टिपावे सुकुमार साजरी झुळुक लाजरी यावी हळु रातराणीचा बहर उधळुनी जावी हे धुंद निरामय वैभव तू फुलवावे