तू अनश्वरातील अमरेश्वर अविनाशी मज देशील का तू दर्शन दिव्य प्रकाशी तू चिरंतनातील ईश्वर असशिल का रे हे दोन घडीचे वैभव नश्वर सारे बरसती तुझ्यावर नक्षत्रांच्या राशी गाईली किती मी तव करुणामय गाणी दाटला गळा मग नयनी उरले पाणी तू मंगल प्रतिभा ब्रह्मतेज आकाशी का तुला न यावी करुणा माझी देवा तू केवळ माझ्या सर्वस्वाचा ठेवा दे मला आसरा तुझिया चरणापाशी