Back
Fitting…

1 page

तू बुद्धी दे तू प्रकाश दे

तू बुद्धी दे तू प्रकाश दे नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे

सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
करिती तुझी जे साधना त्यांना तुझा सहवास दे

सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती
पंखात ह्या बळ दे नवे, झेपावण्या आकाश दे