PrintSource

तूं माझी अन्‌ तुझा मीच

Tu Majhi An Tujha Meech

अनंत काणेकर

तूं माझी अन्‌ तुझा मीच ही खातर ना जोंवरी
प्रीतिची हूल फुकट ना तरी

गालाला पडते खळी मला पाहुनी
ही नजर पाहते धरणी न्याहाळुनी
भयभीत प्रीत थरकते लीन लोचनीं
ओंठाची थरथरत पाकळी बोल गडे झडकरी
प्रीतिची हूल फुकट ना तरी

जिवाजिवाची अभंग जडली जोड असे ही जरी
भीति मग कोणाची अंतरीं
ही गांठ भिडेची तांत गळ्या लाविल
हिरव्याचीं पिवळीं पानें हीं होतिल
प्रीतिच्या फुलाचा वास उडुनि जाइल
फसाल पुरत्या बसाल गाळित घळघळ अश्रू झरी
प्रीतिची हूल फुकट ना तरी