तूं माझी माउली मी वो तुझा तान्हा । पाजीं प्रेमपान्हा पांडुरंगे ॥१॥ तूं माझी गाउली मी तुझें वासरूं । नको पान्हा चोरूं पांडुरंगे ॥२॥ तूं माझी हरिणी मी तुझें पाडस । तोडीं भवपाश पांडुरंगे ॥३॥ तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज । चारा घालीं मज पांडुरंगे ॥४॥ नामा ह्मणे होसी भक्तीचा वल्लभ । मागेंपुढें उभा सांभाळिसी ॥५॥