PrintSource

तू माणूस वेडा

Tu Manus Veda

मधुकर जोशी

पुन्हापुन्हा तू कशास बघसी आरशात मुखडा
तुझे तुला प्रतिबिंब सांगते, तू माणूस वेडा

दया धर्म तू कधी न केला
देव मंदिरी कधी न पूजिला
पैसा पैसा जमवून भरला पापाचा तू घडा

कुटिल नीतीचा तू तर कपटी
तुझी नाटकी भाषा खोटी
गंगेतुनही स्‍नान करून तू असशी रे कोरडा

दुर्लभ आहे जन्म मानवी
इथे न येईल पुन्हा पालवी
भले-चांगले करुनी घेई, देव असे हा खडा