तूं पाक सूरत कामिना कीं दाही बोटीं मीना हातामध्यें वीणा घेऊनिया गाती तुला गुणीजन अवघे चहाती नारी तुझी गजाची ग चाल, भांगी गुलाल मुलायस गाल नवी नवती तूं चंद्रकळा सवती, गायनामध्यें गुणीजन स्तविती कंबर बारीकशी बुंद मनामधीं कुंद मिजाजींत धुंद खुले तव कांती तुला गुणीजन अवघे चहाती नाकीं नथनी ग सर्जेदार फुले अंगी जोहार ग फार वनीं जणुं हे पळसतरूं फुललें गुणावर जन अवघे हे भुलले म्हणे होनाजी बाळा गड्ये अहो फांकडे तुझी चहुंकडे गुणाची होय ख्याती तुला गुणीजन अवघे चहाती