तुझे असून तुजपाशी
तुझे असून तुजपाशी तू जागा चुकलासी कल्पतरू तो असता दारी वणवण फिरशी का बाजारी स्वर्ग तुझा तो तव संसारी सुख त्याचे अविनाशी कस्तुरीमृग तू, तुला न कळले सुगंध शोधीत जीवन सरले घे चाहूल सुख कोठे दडले? ते तुझिया कर-पाशी चुकलो त्याची खंत नको पण चुकता चुकता घडते जीवन अनुतापाने येते उजळून मळले जे भवपाशी