तुझे रूप सखे गुलजार असे काहूर मनी उठले भलते दिनरात तुझा ग ध्यास जडे हा छंद जिवाला लावी पिसे ! ती वीज तुझ्या नजरेमधली गाली खुलते रंगेल खळी ओठांत रसेली जादुगिरी उरी हसती गुलाबी गेंद कसे ! नखर्यात तुझ्या ग मदनपरी ही धून शराबी दर्दभरी हा झोक तुझा घायाळ करी कैफात बुडाले भान असे ! ती धुंद मिठी, बेबंद नशा श्वासांत सखे विरतात दिशा बेहोश सुखाच्या या गगनी मी आज मला हरवून बसे !