तुझीमाझी प्रीत जमली
तुझीमाझी प्रीत जमली नदीकाठी सांजपारी पडल्या चोरून भेटीगाठी पिरतीचा ग तरू वाढं हळूहळू तहानभूक हरू जिवलगासाठी चाफ्याचा ग वास अन् पिरतीचा ग ध्यास लपंल् कसा जरी केली आटाकाटी इवलीइवली खोपी अंगण पुढं-पाठी बिघाभर रान माझं वढ्याकाठी तुझीमाझी प्रीत जमली नदीकाठी सांजपारी पडल्या चोरून भेटीगाठी पिकला हरभरा, गहू तरारला चिमणा चांद आला माझ्या पोटी नगं शहरगाव नगं नाणं-सोनं देवाघरचं लेणं अम्हांसाठी