तुझ्या मनी तेच माझ्या मनी
Tujhya Mani Tech Majha
ग. दि. माडगूळकर
ऐन वयात आलेली, मी रे नाजूक छबेली, आले बाजारा एकली
सांगलीच्या पेठंत, बाजाराच्या वाटंत, काय होतं घाटत, तुझ्या मनी?
तुझ्या मनी तेच माझ्या मनी
मोठ्या कलदार नाण्यांची ओतली
नथ मोत्यांची विकत घेतली
गोर्या नाकात झोकात घातली
आपुल्याच तोर्यात, चालता मी बार्यात, काय आलं होर्यात, तुझ्या मनी?
तुझ्या मनी तेच माझ्या मनी
सार्या चिंचांचा सौदा करून
हारा माथी मी घेतला भरून
घरी निघाले लगबग करून
संग संग चालायचं, काही नाही बोलायचं, हेतू होता हमखास, तुझ्या मनी
तुझ्या मनी तेच माझ्या मनी
आली बोरंची पाणंद थोडी
दोन्ही बाजूनी दाटली झाडी
तुझ्या डोळ्यांत चमचम वेडी
चालताना मागून, हात तुझा लागून, वीज गेली जागून, माझ्या मनी
माझ्या मनी तेच तुझ्या मनी
काही ओळख-पाळख नसून
मी रे पाहिलं उगाचच हसून
थोडं लटकं लटकं रुसुन
पुढं पुढं चालताच, काही नाही बोलायचं, हेतू होता हमखास, तुझ्या मनी
तुझ्या मनी तेच माझ्या मनी