PrintSource

त्या चित्तचोरट्याला का आपुले

Tya Chitta Choratyala Ka

राजा बढे

त्या चित्तचोरट्याला का आपुलें म्हणूं मी?
स्मृतिजाल आसवांचे दिनरात कां विणूं मी

सहजीं करीं धरावे, नख लाउनी खुडावें
कीं फूल मालतीचें बागेतलें जणूं मी

नजरेंत नीट आलें, मी घेतले निशाण
हलतांच पापणीचा हुकला अमोघ बाण
ते मीनकेतनाचें ग मोडिलें धनू मी

आलें मनांत माझ्या किति साळसूद बाई
मी पाहिलें तरीही, ते पाहणार नाहीं
राजीवलोचनाला ग वाहिली तनू मी