त्या गावी त्या तिथवर
त्या गावी, त्या तिथवर, चल झरझर मना पुन्हा ! ती निरुंद पायवाट वळत वळत जाय आत ते शिवार, ती विहीर, पुढे एक लिंब जुना ! अजून उभे त्या तिथेच ते सखिचे घर तसेच ते अंगण, ती तुळशी, त्या तिथल्या मधुर खुणा ! ते यौवन, ती प्रीती ती ओळख, ती भीती त्या शपथा, ती रुसणी, ते समेट क्षणाक्षणां ! रंगविले गोड सूख तिथे उभा अजुनी मूक अपुरे ते चित्र तिथे, पुरे करील कल्पना !