त्या सावळ्या तनूचे
त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग नकळे मनास आता या आवरू कसे ग ! ये ऐकण्यास जेव्हा त्याचा सुरेल पावा चोहीकडे बघे मी परि ना कुठे दिसे ग ! हलतो तरूलतात हा खोडसाळ वात आलाच वाटते तो मी सारखी फसे ग ! खुपते तनूस शेज क्षणही न येत नीज डोळ्यांस तो दिसावा हृदयात जो वसे ग !