त्यांनीच छेडिले ग माझ्या मनी न होते ओढून ओढणीला दारी उभी मी होते करपाश तोचि आले कंठी गडे तयांचे भारावल्या मनाने मी ग अबोल होते अपराध काही नसता शिक्षा मला मिळाली माझ्याच मंदिरी ग मी बंदिवान होते दिनरात साजणाचे बेबंद वागणे हे असते सुखात जर का, मी बालिकाच होते