उभवू उंच निशाण ! नव्या युगाचे नव्या जगाचे, उभवू उंच निशाण ! हीन-दीन जे, दलित-गलित जे त्या सर्वांना ध्वज हा देईल सदैव छाया छान उभवू उंच निशाण ! अंध अमानुष रूढी घालिती अखंड जगी थैमान त्या क्रुरांना हे क्रांतीचे मूर्तिमंत आव्हान ताठ ठेविती मान झुंजुनी भीमदेव धीमान् शूर शिपाई आम्ही त्यांचे, व्यर्थ न ते बलिदान ध्वज मिरवीत हा गौतम गेले टाकुनी राज्य महान पुसुनी आसवे मानवतेची होती बुद्ध महान हे समतेचे हे ममतेचे, गांधीजींचे गान हरिजन धरुनी उरी स्वीकरी जे फकिरीचे वाण