उदो उदो मागते अंबाबाईचा
Udo Udo Magate Amba
अनिल गोगटे
उदो उदो उदो मागते अंबाबाईचा जोगवा हो अंबाबाईचा जोगवा
पालवते लिंबाचा टहाळा, देवीला हो जागवा
कुणी देवीला हो जागवा बाई देवीला हो जागवा
(कळून येईना पाव)[१] देवीचा भाव तिचा परभाव
कुणाला ठावं होमामंदी जन्मुनी रहाणं तुळजापूर गाव
पालवते लिंबाचा टहाळा, देवीला हो जागवा
कुणी देवीला हो जागवा बाई देवीला हो जागवा
मळवट भरला भुत्या रंगला कवडीमाळा घातल्या गळा
पायामंदी घालुनी वाळा नाच रंगुनी यावा
पालवते लिंबाचा टहाळा, देवीला हो जागवा
कुणी देवीला हो जागवा बाई देवीला हो जागवा
आसूड कडाडे अंग उघडे रक्त जरी उडे नाचती पुढे
शुक्र-मंगळवार देवीचा (प्रसाद तुम्ही हा मिळवावा)[१]
पालवते लिंबाचा टहाळा, देवीला हो जागवा
कुणी देवीला हो जागवा बाई देवीला हो जागवा