उघडी नयन शंकरा
उघडी नयन शंकरा, वसंत ये वनांतरी दर्यादर्यांत नाचती, गात यक्षकिन्नरी अचल ध्यान हे तुझे मला न आज पाहवे जीवाशिवात दूरता मला न आज साहवे ऊठ चंद्रशेखरा करास या धरी करी पहा प्रसन्न पद्मिनी जलाशयात डुंबिती नील कमलिनीस त्या राजहंस चुंबिती अधीर आस माझिया थरथरे मनी-उरी