उमलले आभाळभर हे चांदणे माझेतुझे लपवुनी लपलेच नाही भेटणे माझेतुझे दरवळाया लागली ही शांतता दोघांतली केवढे गंधाळले ! गंधाळणे माझेतुझे हे असे श्वासांतल्या श्वासात आपण बोललो आणि वार्याला समजले बोलणे माझेतुझे उजळला एका क्षणी दोघांतला काळोख हा एकमेकांतून आता तेवणे माझेतुझे