उनाड पाऊस अशांत पाऊस अधीर भिरभिणारा पाऊस निरोप घेऊन आभाळाचा भटके हा बंजारा पाऊस हाक तृषेची येता कानी मातीची ऐकून विराणी मेघांच्या कुंभातुन बरसे अमृतमय जलधारा पाऊस प्राण नवे झाडांना देई गीत नवे पक्ष्यांना देई बैरागी रानातून फिरवी शांत शीतल वारा पाऊस पहाड राने नदी सरोवर ऊराउरी भेटून सार्यांना एकाएकाला लावून जाई सृजनाचा भंडारा पाऊस