उंच उंच माझा झोका.. झोका बांधला आकाशाला, झोका चढतां उतरतां झाला पदर वारा वारा ! झोक्याला देतें वेग पाय टेकून धरणीला, लाल मातीच्या परागाचा रंग चढतो पावलाला ! झोका चढतो पूर्वेवर जाईजुईंनी सावरीला, दंवाधुक्याचा शुभ्र साज अंगावरती चढवीला ! झोका चढतो पश्चिमेला वेल लालन देते तोल, मोकळ्या केसांमधे गुंफी सनया लाल लाल. झोका चढतो उंच उंच पाय पोचती मेघांवरती, इंद्राच्या डोहावरी लाल पाखरें पाण्या येती ! झोका चढतो उंच उंच मला थांबतां थांबवेना; गुंजेएवढें माझें घर त्याची ओळख आवडेना !