उर्मिले, त्रिवार वंदन तुला ! त्यजुनि राजसुख जरी जानकी वनात गेली प्रभु सांगाती राजमंदिरी तूच साहिल्या वियोगातल्या कळा ! सतत साउलीसम रामाला भ्राता लक्ष्मण कृतार्थ झाला तुझ्या मनातिल मुक्या भावना, कधी न तो उमगला ! अंधारातिल तू ज्योतीसम आयु वेचिले अपुले कण कण सुख-तृप्तीचा कधी न तुला गे वाराही लाभला ! राम-जानकी वियोगातुनी घडले रामायण हे भुवनी तुझी तपस्या, तुझा त्याग परि नच लोकी ठसला ! थोरचरित तू, दूर राहुनी सुगंध भरला तू रामायणी उपेक्षाच परि तुझ्या कपाळी न्याय जगी आगळा !