PrintSource

उतरली सांज ही धरेवरी

Utarali Sanj Hi Dharevari

सूर्यकान्‍त खाण्‍डेकर

उतरली सांज ही धरेवरी
मी उभी घेउनी कलश करी

सांज मनी दरवळे मनोहर
गात तरंगत जल लहरीवर
करीत व्याकुल माझे अंतर
मज साद घालतो परोपरी

उरे शांतता या पथी निर्जन
प्रेमनदीला भरती येऊन
उठती लहरी चंचल उसळून
ही वळती पाउले तटावरी

येईन का मी नाही परतुन?
तिथेच कोणा राहिन बिलगुन?
वीणा वाजवी कुणीतरी मोहन
तो नाद अनोखा घुमे उरी