उठा उठा चिऊताई
उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही ! सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी डोळ्यांवर झोप कशी अजूनही ! लगबग पांखरे ही गात गात गोड गाणे टिपतात बघा दाणे चोहीकडे ! झोपलेल्या अशा तुम्ही आणायाचे मग कोणी बाळासाठी चारापाणी चिमुकल्या ! बाळाचे मी घेता नाव जागी झाली चिऊताई उठोनिया दूर जाई भूर भूर !