PrintSource

उठा उठा सकल जन

Utha Utha Sakal Jan

पारंपरिक

उठा उठा सकल जन
वाचे स्मरावा गजानन
गौरीहराचा नंदन गजवदन गणपती

ध्यानि आणुनी सुखमूर्ती
स्तवन करा एके चित्ती
तो देईल ज्ञानमूर्ती मोक्ष सुख सोज्वळ

जो निजभक्तांचा दाता
वंद्य सुरवरां समस्तां
त्यासी ध्याता भवभय चिंता, विघ्‍नवार्ता निवारी

तो हा सुखाचा सागर
श्री गणराज मोरेश्वर
भावे विनवितो गिरिधर भक्त त्याचा होउनी