अरुण उगवला अनुरागाचा
अरुण उगवला अनुरागाचा उजळत आभाळी उषा प्रीतीची हासत लावी कुमकुम मंगल भाळी नेत्रकमळीचा भ्रमर उडाला मरंद उधळीत फुलू लागला हर्ष सुगंधी पुष्पपाकळीत घेत भरारी जीव-पाखरे आळवित भूपाळी स्वर्गसुखाचा आज मोहरे कल्पतरू दारी तुळस-मंजिरी डुलू लागली रामाच्या प्रहरी जोडुनी कर हे प्रीत-सुवासीन प्रदक्षिणा घाली