PrintSource

धीर धरी धीर धरी जागृत

Dheer Dhari Dheer Dhari

विद्याधर गोखले

धीर धरी धीर धरी जागृत गिरिधारी
तारितसे भाविकांस तोच चक्रधारी

अढळ पदी अंबरात बसविले ध्रुवाला
संकटांत पीताम्बर दिला द्रौपदीला
ऐसा दाता थोर कुंज-वन विहारी

होसी का भयकंपित धरसी का शंका?
गाजतसे वाजतसे तयाचाच डंका-
'जय गोविंद जय मुकुंद जय जय सुखकारी'