जा जा रानीच्या पाखरा तू
जा जा रानीच्या पाखरा, तू जा रं भरारा तुला घालिते चारा, तुला घालिते चारा द्यावा संदेसा म्हायेरा, जा रं भरारा ! दूर डोंगरापल्याड नदीकाठी माझा गाव तिथं नांदतोया देव नरसुबाराव लहानथोरांसी मायेचा त्योच आसरा ! बाई म्हायेराचं थोरपन वानु कसं? पुण्यवंत माझं मायबाप देव जसं गंगा निर्मळ मायेचा व्हातोया झरा ! माझ्या खुशालीचा सांगावा दे माउलीला पड पाया तिच्या, सांग येती याद मला तुला भेटाया हुतो माझा जीव घाबरा !