PrintSource

पडले स्वप्‍न पहाटेला

Padale Swapna Pahatela

पुरुषोत्तम पाटील

पडले स्वप्‍न पहाटेला
स्वप्‍नी बनुनी गौळण मी ग गेले यमुनेला

चार पाउले वाट चालले
तोच मनातील हेतू फिटले
अवखळ हासत मोहन दिसला माझ्या नजरेला

अवचित सारे त्याला कळले
आणि बोलता लबाड डोळे
धीटपणे ग मला इशारा त्यानीच ना केला

लाजत पण मी गेले जवळी
दिव्य प्रीतिचे जीवन उजळी
बागच फुलली, नसती काटे माझ्या वाटेला