PrintSource

पंढरींचे सुख नाही त्रिभवनीं

Pandhariche Sukha Nahi

संत चोखामेळा

पंढरींचे सुख नाहीं त्रिभुवनीं ।
प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे ॥१॥

त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ ।
दक्षिणमुख वाहात चंद्रभागा ॥२॥

सकळ संतांचा मुकुटमणी देखा ।
पुंडलिक सखा आहे जेथें ॥३॥

चोखा ह्मणे तेथें सुखाची मिराशी ।
भोळ्या भाविकांसी अखंडित ॥४॥