पंख जरी जळलेले
पंख जरी जळलेले नील नवे पाहीन मी मृत्युंजय मुक्तीचे गीत नवे गाईन मी काजळल्या आभाळी गवसावा सूर कुठे किरणांच्या स्पर्शाने पक्ष्याला कंठ फुटे राखेतुन उंच उडून गगनशिरी जाईन मी मी म्हटले ईश्वरास जळताना ज्वालांवर नाचणार नाही मी सबळांच्या तालावर अक्रोशत एकाकी विजनातच राहीन मी धडधडून प्रलयाग्नी आला जर घेत घास निर्जनात पक्ष्यांची पडली जर प्रेतरास शेवटला उंच सूर मुक्तीला वाहिन मी