PrintSource

प्रेमरंगी रंगता आनंद पसरे

Prem Rangi Rangata

जगदीश दळवी

प्रेमरंगी रंगता आनंद पसरे दशदिशा
अमृताचा ओघ वाहे जीवनी फुलते उषा

कमलपुष्पातील तंतु, तेवि नाजूक बंधने
जीव जीवा भेटण्याला धावती त्या ओढीने
प्रेम देता लाभते सार्‍या सुखाची मंजुषा