PrintSource

तेच स्वप्‍न लोचनांत

Tech Swapna Lochanat

यशवंत देव

तेच स्वप्‍न लोचनांत रोज रोज अंकुरे
पाहतो नभात मी धुंद दोन पाखरे

शरद चांदण्यातली भेट आठवे मला
गुपित सांगता तुझा अधर मात्र रंगला
रास संपला तरी भास अंतरी उरे

तू सखे अजाणता कर करांत गुंफिला
तुलामला तसे बघून गगनी चंद्र लाजला
त्या स्थळी अजून मंद बकुलगंध मोहरे

स्वप्‍नचूर लोचनांत एक रम्य आकृती
सूर सूर होत सर्व भावना निनादती
वाजतात पायीची बघ अजून नूपुरे