PrintSource

त्याची धून झंकारली

Tyachi Dhoon Jhankarali

यशवंत देव

त्याची धून झंकारली रोमारोमांत
उमलून जीव आला माझ्या डोळ्यांत

चांदण्यांची लुकलुक झुले गगनी
बासरीने भारावून गेली रजनी
रासरंग उधळला कोनाकोनांत

दूर यमुनेच्याकाठी पाय वाजले
दिशांच्या गर्भात झाली निळी वादळे
चैतन्याचे वारे आले वाळवंटात

सावळ्याची खूण सखे टाळी वाजली
धावू लागे मन आता आनंदमेळी
नुरले ग माझेपण माझ्या देहात